LCB : नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

0
LCB : नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
LCB : नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : नगर : नगर-पुणे रस्त्यावर (Nagar – Pune Road) चास शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली कुख्यात गुंड त्याचे इतर चार साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ९० हजार ६०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

संशयित आरोपींची नावे

गौरव हरिभाऊ घायाळ ( वय-२४, रा. सुपा), सतीश बाळासाहेब पावडे (वय-३५, मुळ रा. दरोडी, ता. पारनेर), अनिकेत रमेश साळवे (वय- २९, रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा), विशाल सुरेश जाधव (वय-२३,रा. अपधुप रोड, सुपा), गोविंद बबनराव गाडे (वय-३६, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना आढळले आरोपी (LCB)

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (पहाटे ४ वाजता) दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांना गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर ते पुणे जाणारे रस्त्यावर चास घाटाजवळ एक चारचाकी वाहनात गौरव घायाळ व त्याचेबरोबर तीन ते चार व्यक्ती दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित आरोपीस ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून १ पिस्टल व जिवंत काडतुस, १ तलवार, १ गिलव्हर, १ बेसबॉलचा दांडका, ६ मोबाईल, असा एकूण ७ लाख ९० हजार ६०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, ह्दय घोडके, दीपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भिमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांच्या पथकाने केली.