Sadhvi Mahasati : आदर्शवत जीवनशैलीसाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक : साध्वी महासती दिव्यदर्शन महाराज

Sadhvi Mahasati

0
Sadhvi Mahasati : आदर्शवत जीवनशैलीसाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक : साध्वी महासती दिव्यदर्शन महाराज
Sadhvi Mahasati : आदर्शवत जीवनशैलीसाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक : साध्वी महासती दिव्यदर्शन महाराज

Sadhvi Mahasati : नगर : आदर्शवत जीवनशैलीसाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. आपापसात बोलताना कमी बोला, मोबाईलचाही (Mobile) वापर कमी करा. या गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करून जेवनावरही नियंत्रण ठेवा. जेवढा वेळ तुम्ही या गोष्टींसाठी देत आहात त्या वाचलेल्या वेळेत जप, तप व सेवा करा, हेच परमात्माला अपेक्षित आहे, असा उपदेश साध्वी महासती (Sadhvi Mahasati) दिव्यदर्शन महाराज यांनी केले.

अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

३१ दिवसांच्या उपवासांची पचकावणी

केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मासात शीतल निलेश जांगडा व वैशाली दीपक कांकरिया यांनी केलेल्या ३१ दिवसांच्या उपवासांची पचकावणी नुकतीच साध्वी महासती दिव्यादर्शन महाराज व महासती पुनितदर्शन महाराज यांच्या उपस्थितीत झाली. तसेच अकोळनेर येथील स्थानकातही आदर्शऋषी महाराजांनी कांकरिया व जंगडा यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक केले. उपवासाच्या सांगता निमित्त केडगाव स्थानकाच्या वतीने दोन्ही महासतींना ज्येष्ठ नागरिक पनालाल बोकरिया व केडगाव जैन स्थानकाचे अध्यक्ष अतुल शिंगवी यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. यावेळी स्थानकाचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका

साधनेमुळे जीवनामध्ये मोठ्या प्रमाणत बदल (Sadhvi Mahasati)

दिव्यदर्शन महाराज यांनी आपण छोट्या छोट्या कार्यातून कसे चांगले काम व सेवा करू शकतो याचे विश्लेषण करून सेवेचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या, शीतल जांगडा व वैशाली कांकरिया यांनी ३१ दिवस उपवास करून मोठा तप केला आहे. त्यांच्यापासून सर्व नागरिकांनी प्रेरणा घ्यावी व त्यांच्या प्रमाणे तप करावा. या साधनेमुळे जीवनामध्ये मोठ्या प्रमाणत बदल होतो. व परमात्माचे आशीर्वाद लागतात. या दोघींनीही आपल्या कुटुंबाबरोबरच केडगावची शान वाढवली आहे. केडगाव जैन स्थानकाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काम खूप उत्कृष्ट व प्रेरणादायी असून त्यांनी ज्या पद्धतीने या चतुर्मासाची नियोजन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. 

अतुल शिंगवी म्हणाले, जैन स्थानकाच्या इतिहासात आजचा दिवस आनंदी व सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. शितल जांगडा व वैशाली कांकरिया यांनी ३१ दिवस उपवास करून आदर्श निर्माण केला आहे. केडगाव जैन स्थानकाच्या विविध उपक्रमामुळे केडगावमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती, नागरिक, युवक व महिला उत्स्फूर्तपणे सहकार्य करत सहभागी होत आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक गणेशमल कांकरिया, पोपटलाल शिंगवी, फुलचंद चंगेडिया, रत्नमाला चोरडिया, शशिकला गांधी, राजू धोका, राजू बडेरा, जैन स्थानकाचे उपाध्यक्ष मयुर चोरडिया, सचिव रुपेश गुगळे, सह सचिव विपुल कांकरिया व ललित गुगळे, खजिनदार सोहन बरमेचा, परेश बलदोटा, रोहन चंगेडिया, कुशल भंडारी, पियुष बाफना, कमलेश फिरोदिया, दर्शन गांधी, पारस शेटीया, कमलेश गुंदेचा, राहुल शिंगवी, उमेश बलदोटा, सफल जैन, सुशील फिरोदिया, निलेश जांगडा, पारस जांगडा, दीपक कांकरिया, महेश गांधी, यश भंडारी, महावीर बोरा, महेंद्र बोरा, कमलेश पोखर्णा, गणेश भंडारी, अमित मेहेर आदींसह नागरिक उपस्थित होते.