Radhakrishna Vikhe Patil : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना

Radhakrishna Vikhe Patil : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना

0
Radhakrishna Vikhe Patil : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना

Radhakrishna Vikhe Patil : नगर : जिल्ह्यातील सहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rains) निर्माण झालेल्या परीस्थितीत नागरीकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना (Collector) देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे २२७ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका

नद्या ओढे नाले यांना पाणी येवून पूरग्रस्त परीस्थिती

जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिंचोडी, चास, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव, साकत, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव, मंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी, अकोला या महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व नद्या ओढे नाले यांना पाणी येवून पूरग्रस्त परीस्थिती निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत (Radhakrishna Vikhe Patil)

मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, जीवितहानी कुठेही होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून सर्व परीस्थिती जाणून घेतली आहे. प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांच्या स्थलांतरास प्राधान्य दिले आहे. जामखेड, पाथर्डी- सोलापूर मार्गावरील कुशल ट्रव्हल कंपनीच्या बस मधील ७० प्रवाशांची सुटका अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने केली. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील पुरात अडकलेल्या ३ आणि पिंपळेगव्हाण मधील एका व्यक्तीला तसेच खरमाटवाडी मधील २५ कोरडगाव मधील ४५ कोळसांगवी मधील १२ व्यक्तिंची सुटका करण्यात आली आहे.


जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटंबातील ४ आणि वंजारवाडी येथे खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने ३० व्यक्तीची सुटका महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील १२ आखेगाव येथील २५ लोकांची सुटका करण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरीकांना यश आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. पावसाची अधिकची शक्यता लक्षात घेवून पुणे येथून एन.डी.आर.एफ पथक बोलावून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.