Sangram Jagtap : नगर : एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे शारदीय नवरात्र उत्सवाची (Sharadiya Navratri Festival) मंगल सुरुवात सोमवारी (ता.२२) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व माजी नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा व घटस्थापनेने (Ghatasthapana) झाली. यावेळी मंत्रोच्चार व धार्मिक विधीने वातावरण भक्तीमय बनले होते. घटस्थापने नंतर देवीची आरती करण्यात आली.
अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांची उपस्थिती
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदींसह मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, गंगाधर वाकळे, लक्ष्मण गव्हाणे, आकाश कातोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, हनुमंत कातोरे, साहेबराव सप्रे, ज्ञानदेव सप्रे, पंकज वाकळे, महेश कांडेकर, किशोर भोर, अशोक बडे, विशाल गोरख कातोरे, सीताराम भोर आदींसह भाविक उपस्थित होते.
नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका
आमदार जगताप यांच्या हस्ते मालदीप ज्योत प्रज्वलीत (Sangram Jagtap)
संबळ-डफच्या निनादात रेणुका मातेच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. मुंजोबा युवक मंडळाच्या तरुणांनी राशीन येथील देवीच्या मंदिरातून आणलेली पवित्र ज्योतचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या ज्योतद्वारे आमदार जगताप यांच्या हस्ते मालदीप ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नवरात्र उत्सवात नारी शक्ती असलेल्या देवीचे विविध रूप पूजले जातात. नारी शक्ती मोठी शक्ती असून, नारी ही समाजाची उध्दारकर्ती आहे. हिंदू धर्मात देवींना मोठे स्थान असून, ते शक्तीचे रूपे असल्याचे त्यांनी सांगितले. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली. आरती, देवीच्या जयघोषांनी वातावरण अधिक मंगलमय झाले होते. यावेळी देवस्थानात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सौंदर्य खुलून दिसत आहे.