Radhakrishna Vikhe Patil : नगर : जिल्ह्यात पावसामुळे (Rain) झालेल्या शेतीपीकांच्या नुकसानीची तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसेच ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण (Encroachment) कोणालाही पाठीशी न घालता एका महिन्यात हटविण्याचे सक्त निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
अतिक्रमणामुळे पाणी शेतात घुसल्याचे निदर्शनास
अतिवृष्टीमुळे भगवतीपूर, पाथरे, हनुमंतगाव या परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने पाणी शेतात घुसल्याचे निदर्शनास आले.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक (Radhakrishna Vikhe Patil)
या पार्श्वभूमीवर नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जलसंपदा, बांधकाम यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची लोणी येथे बैठक झाली. बैठकीस शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे आदी अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.