Murder : नगर : राहुरी तालुक्यातील लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Assault) गुन्ह्यातील प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस पोलीस प्रशासनाने उघड केला असून, ताब्यातील आरोपीने खून (Murder) करून मृतदेह (Dead Body) पुरल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह राहुरी तालुक्यातील दवनगाव येथून बाहेर काढला आहे.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य घेतले होते ताब्यात
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक महिलेने बुधवारी (ता.१७) राहुरी पोलीस यांना दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य ताब्यात घेतले होते. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाचे चक्र फिरवत गुन्ह्यातील आणखी एक आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय ३२, रा.राहता) यास अटक कारण्याबाबात तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्याकरिता व इतर तपासाकरिता ताब्यातील आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
राहत्या घरामागे पुरला मृतदेह (Murder)
पोलीस तपासा दरम्यान या दांपत्याने अल्पवयीन मुलीं पैकी एका अल्पवयीन मुलीचे (वय १४), असताना पन्नास वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षा पूर्वी लग्न लावून एक लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. व नंतर परत तीन महिन्याने तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणले. तर दुसऱ्या मुलीचे (वय १६), अल्पवयीन असताना लग्न लावून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. याबाबत अधिक तपास सुरू असताना पोलीस कोठडीत आरोपींकडे पसार असलेल्या आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु आज (ता. २३) अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता बजरंग कारभारी साळुंखे (वय ३९, रा. दवणगाव याने गुन्ह्यात पसार असलेला आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्यासोबत मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने मार्च २०२५ मध्ये एके दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे राहते घरी गळा दाबून खून केला. व त्याचा राहत्या घरामागे खड्डा खोदून मृतदेह पुरून पुरावा नष्ट केला.
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट संध्या दळवी यांना पाचरण करून दोन पंचा समक्ष अटक आरोपीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे खात्री केली असता दुपारी आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह जमिनीतून काढण्यात आला. या मृतदेह फॉरेन्सिक तपासणी कामी प्रायमरी हेल्थ सेंटर चे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तहा खान व प्रसाद मासाळ यांच्यामार्फत पोस्टमार्टम करून अंत्यविधी करिता त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या मदतीने सरकारी पंचां समक्ष अंत्यविधी करण्यात आला आहे.
याबाबत राहुरी पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, अशोक शिंदे, गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे यांनी केली.