Mahendra Gandhe : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवडा अभियानात अहिल्यानगरच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या (Prajapita Brahma Kumaris Ishwariya Vishwa Vidyalaya) वतीने नशा मूक्ती अभियान राबवण्यात आले. यामध्ये निर्व्यसनाची शपथ देण्यात आली. युवा पिढीला उपदेशात्मक व प्रबोधनात्मक उपाययोजनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप (BJP) पक्षाचे विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे (Mahendra Gandhe) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी बी. के. राजेश्वरी दीदी, माजी नगरसेविका सुप्रिया जाधव यांच्यासह बी. के निर्मला दीदी, बी. के. सुवर्णा दीदी, बी. के. प्रभा दीदी, व्यंकटेश बोमादंडी, सुमित बटुळे, हुजेफा शेख, बी. के. साईनाथ, बी. के. दीपक, बी. के. नरेश, बी. के. संजय गोसावी व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, (Mahendra Gandhe)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केवळ १० वर्षातच प्रगतीच्या शिखरावर नेले आहे. त्यांच्या या कामामुळे भारताची जगात प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावली आहे. आता देशाची वाटचाल आत्मनिर्भर भारताकडे होत आहे. अशा महान कर्तृत्ववान देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस सर्वत्र सेवा पंधरवड्याने साजरा होत आहे. आपल्या अहिल्यानगरचा प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवार या उपक्रमात सहभागी होत नाशमुक्तीची चळवळ सुरु केली आहे. हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून सध्या तरुण पिढी व्यसनाकडे आकर्षित होत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवाराच्या उपक्रमामुळे तरुणांमध्ये जनजागृती होईल.