Kalsubai Shikhar : अकोले: राज्यातील सर्वोच्च कळसूबाई शिखर (Kalsubai Shikhar) नवरात्रीच्या पावन पर्वावर भक्ती, श्रद्धा आणि शौर्याने उजळून निघाले आहे. घोटी शहरातील कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी (Mountaineers) यंदाही खंडन होवू न देता घटस्थापना (Ghatasthapana) केली आहे.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
मुख्यमंत्र्यांनी घटकलशाचे पूजन करून केला सुपूर्द
सन 1997 पासून अखंडपणे हा अनोखा धार्मिक उपक्रम जोपासत आहेत. तब्बल 29 वर्षांपासून नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत उपवास आणि दररोज शिखर सर करून शिखरस्वामिनी कळसूबाई मातेसमोर पूजा-अर्चा करण्याची परंपरा मंडळाने खंडन होऊ दिलेली नाही. या भक्तीमय पर्वाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घटकलशाचे पूजन करून मंडळाला सुपूर्द केला. गिर्यारोहकांच्या श्रद्धा व साहसाचे कौतुक करीत त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी गिर्यारोहकांनी शिखरावर आवश्यक सुविधा व आधुनिक सोयी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष कळसुूबाई मातेच्या दर्शनाला यावे अशी विनंती केली.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
आरती व घटस्थापना करून भक्तीचा दीप प्रज्वलित (Kalsubai Shikhar)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच पहाटे मंडळाचे गिर्यारोहक शिखर सर करून कळसूबाई मातेचे पूजन, आरती व घटस्थापना करून भक्तीचा दीप प्रज्वलित केला. एकदा शिखर सर करून परतल्यावर साधारण गिर्यारोहक दोन दिवस विश्रांती घेतात, पण हे गिर्यारोहक गेल्या तीन दशकांपासून न थकता, न थांबता रोज सर्वोच्च शिखर सर करीत आहेत. हीच त्यांची भक्ती, श्रद्धा व पराक्रमाची खरी ओळख आहे. या स्तुत्य उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ. महेंद्र आडोळे, डॉ. कैलास गायकर, नीलेश आंबेकर, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, बाळू आरोटे, अशोक हेमके, बाळू भोईर, राजेंद्र माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, विकास जाधव, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, चेतन जाधव आदी गिर्यारोहक उपस्थित होते.