Ram Shinde : नैसर्गिक संकटाचा धैर्याने सामना करा : सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : नैसर्गिक संकटाचा धैर्याने सामना करा : सभापती प्रा. राम शिंदे

0
Ram Shinde : नैसर्गिक संकटाचा धैर्याने सामना करा : सभापती प्रा. राम शिंदे
Ram Shinde : नैसर्गिक संकटाचा धैर्याने सामना करा : सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : नगर : नैसर्गिक संकटाच्या (Natural Disaster) काळात नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने सामना करावा. एकमेकांना सहकार्य करणे हीच खरी ताकद आहे. प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठलीही जीवित वा पशुहानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटले आहे. 

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान

जामखेड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नुकसानीची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी (ता.२३) प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अल्का अहिरराव, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार मच्छिंद्र ठाणके यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची ग्वाही (Ram Shinde)

मोहरी येथील तुटलेल्या तलावाचे निरीक्षण करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दिघोळ व जातेगाव येथे मांजरा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या शेतजमिनी, नुकसानग्रस्त घरे व घरातील वस्तूंची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व शेतपीक, जमीन, घरे, विहिरी, पशुधन आणि अन्य नुकसानीचे तातडीने व सरसकट पंचनामे करून मदत तत्काळ पोहोचवावी. कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.