Shri Badisajan Oswal Shri Sangh : बडीसाजन ओसवाल श्री संघ समाज सहकार्यातून प्रेरणा देत आहे : पेमराज बोथरा

Shri Badisajan Oswal Shri Sangh

0
Shri Badisajan Oswal Shri Sangh : बडीसाजन ओसवाल श्री संघ समाज सहकार्यातून प्रेरणा देत आहे : पेमराज बोथरा
Shri Badisajan Oswal Shri Sangh : बडीसाजन ओसवाल श्री संघ समाज सहकार्यातून प्रेरणा देत आहे : पेमराज बोथरा

Shri Badisajan Oswal Shri Sangh : नगर : बडीसाजन ओसवाल समाजाचे (Shri Badisajan Oswal Shri Sangh) बऱ्याच वर्षांपासूनचे स्वप्न सॉलीटियर या नव्या व भव्य सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी समाजातून फार मोठा हातभार मिळाला. त्यामुळेच मुदतीत हा प्रकल्प (Project) पूर्णत्वास गेला. बडीसाजन ओसवाल श्री संघ करत असलेल्या समाजाभिमुख कामची पावती सर्व समाजाने सहकार्य करून देत पाठीवर थाप मारली आहे. यामुळे अधिक प्रेरणा मिळत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे संस्था प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा (Pemraj Bothra) यांनी केले.

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पडली पार

श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी विषय पत्रीकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर केले. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष अजित कर्नावट, सचिव विशाल शेटिया, सहसचिव अनिल लुंकड, खजिनदार मिलिंद जांगडा, सहखजिनदार दीपक बोथरा व सर्व संचालक आदींसह मोठ्या संख्येने समाजातील नागरिक उपस्थित होते. 

पेमराज बोथरा पुढे म्हणाले, (Shri Badisajan Oswal Shri Sangh)

स्व.विलासभाऊ लोढा यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील गरजू कुटुंबीयांसाठी बोथरा परिवाराच्या वतीने केडगाव येथे उभारण्यात येत असलेल्या घरकुल अपार्टमेंट पूर्णत्वास आले आहे. लवकरच हे घरकुले लाभार्थींना देण्यात येणार आहेत. संस्थेच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी सुवर्ण कमळ योजनेतही वाढ केल्याने समाजातील नागरिकांना याचा मोठा आधार निर्माण झाला आहे. बडीसाजनच्या युवक संघाचेही काम कौतुकास्पद असून समजाच्या प्रत्येक कार्यात ते तत्पर असतात. 

वार्षिक सभेत समाजाच्या विविध उपक्रमांना सातत्याने सहकार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, संस्थेचे उपाध्यक्ष अजित कर्नावट, ॲड. राजेंद्र बलदोटा, दिलीप बोरा, प्रीतेश दुग्गड व दिलीप कर्नावट आदींचा सत्कार करण्यात आला. 

माणिकनगर येथील बडीसाजन मंगल कार्यालयाच्या बैंक्वेट हॉलचे नूतनीकरण करणार असून भव्य ४०० आसन व्यवस्थेसह अत्याधुनिक व आकर्षक वातानुकूलित हॉलच्या कामास सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. या कामासाठी अध्यक्ष पेमराज बोथरा परिवार व उपाध्यक्ष अजित कर्नावट परिवार यांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी वार्षिक सभेचे प्रास्ताविक संचालक मनोज शेटिया यांनी केले. सचिव विशाल शेटिया यांनी संस्थेच्या कार्याची  सविस्तर माहिती देऊन सूत्रसंचालन केले. खजिनदार मिलिंद जांगडा यांनी इतिवृत्त व ताळेबंद मांडला. उपाध्यक्ष अजित कर्नावट यांनी आभार मानले. या सभेस बडीसाजन संघाचे संचालक धरमचंद कोठारी, पोपटलाल कटारिया, नरेंद्र चोरडिया, राजेंद्र ताथेड, नरेंद्र बाफना, राजेंद्र बोथरा, पोपट लोढा, किरण भंडारी, युवक संघाचे धीरज लोढा आदींसह मोठ्या संख्यने सभासद उपस्थित होते.