Kapoorwadi Lake : कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत; नागरदेवळे ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

Kapoorwadi Lake : कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत; नागरदेवळे ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

0
Kapoorwadi Lake : कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत; नागरदेवळे ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन
Kapoorwadi Lake : कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत; नागरदेवळे ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

Kapoorwadi Lake : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे हद्दीत असलेला कापूरवाडी तलाव (Kapoorwadi Lake) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तुडुंब भरून धोकादायक स्थितीत आला आहे. तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, बाभळी वाढल्याने व भिंतीमधून पाणी पाझरण्याने दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांच्यासह ग्रामस्थानी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले आहे.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

आदी उपस्थित

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सुशिल कदम, निखिल शेलार, सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे, राजेश धाडगे, मोहसीन पठाण, समीर पठाण आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्यता (Kapoorwadi Lake)

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नाले, ओढे, बंधारे तुडुंब भरले आहेत. कापूरवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या दोन दिवसांपासून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरदेवळे गावाचे अनेक पुलांवरून पाणी वाहून संपर्क तुटला होता. तलाव लष्करी हद्दीत असल्याने अनेक वर्षांपासून गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे नागरदेवळे गावठाण, पाखरे मळा, पानमळकर मळा, पादीर मळा, बिने मळा, लोंढे मळा, खरपुडे वस्ती तसेच भिंगारलगतचा परिसर धोक्यात आला आहे. भिंत फुटल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.