Pune Accident:परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारची जोरदार धडक;अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर  

0
Pune Accident:परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारची जोरदार धडक;अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर  
Pune Accident:परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारची जोरदार धडक;अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर  

Pune Accident: पुणे जिल्ह्यातील (Pune) मंचर (Manchar) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात (Annasaheb Awate College) प्रात्यक्षिक परीक्षेला जाणाऱ्या तरुणीला भरधाव कारने धडक (The young Woman hit the car) दिल्याने गंभीर अपघात (Accident) झाला आहे. ही घटना पिंपळगाव फाटा (Pimpalgaon Fata) परिसरात घडलीय. ऋतुजा चंद्रकांत पारधी असं जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सध्या तिच्यावर मंचरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग;जालना शहरात घडली घटना 

नेमकं काय घडलं ? (Pune Accident)

मंगळवारी (ता. २३) दुपारी स्वामी समर्थ मंदिराजवळ ऋतुजा पायी जात असताना समोरून आलेल्या कारने तिला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ती थेट ७ ते ८ फूट हवेत उंच फेकली गेली व नंतर रस्त्यावर कोसळली. या अपघातात तिच्या डाव्या पायाला आणि टाचेला गंभीर दुखापत झाली. मात्र डॉक्टरांनी तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे. परीक्षेच्या तयारीत असलेली ऋतुजा अचानक झालेल्या या अपघातामुळे धक्का बसलेल्या अवस्थेत आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून आला आहे. अपघातानंतर कारचालक शरदराव शिंदे यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तरीसुद्धा दुसऱ्या दिवसापर्यंत मंचर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पहा: तुळजाभवानीच्या माहेरी दर्शनासाठी आल्या सुवासिनी

ऋतुजाची आई काय म्हणाली ? (Pune Accident)

यावेळी ऋतुजाच्या आईने डोळ्यात अश्रू आणत सांगितले की, “माझं लेकरू कसंबसं बचावलयं, हाच माझ्यासाठी दिलासा आहे. पण तिच्या उपचारासाठी पुढील काही महिने मला काम थांबवावं लागणार आहे. मी रुग्णालयात साफसफाई करून घर चालवते. औषधोपचाराचा खर्च जर कारमालकाने उचलला, तर आम्ही पोलिसात तक्रार करणार नाही.” अस म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका क्षणात बदललेल्या आयुष्यामुळे ऋतुजा व तिच्या कुटुंबावर संघर्षाचे सावट आले आहे.