Kidnapping : नगर : तब्बल १० वर्षांपासून तपासाअंती अंधारात असलेला एक गंभीर गुन्हा (Serious Crime) अखेर उघड झाला असून श्रीरामपूर येथील अपहृत (Kidnapping) अल्पवयीन मुलगी सुरक्षितपणे पोलिसांच्या (Police) ताब्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने ही कामगिरी केली.
अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड
२०१५ ला अल्पवयीन मुलीस फुस लावून नेले होते पळवून
आशिर्वादनगर, श्रीरामपूर येथून एका अज्ञात आरोपीने १४ ऑक्टोबर २०१५ रोजी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दीर्घकाळ तपास लागला नसल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, अहिल्यानगर येथे वर्ग करण्यात आला. या वेळी गुन्ह्यात वाढ करण्यात आली होती.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…
सातत्यपूर्ण शोधानंतर मिळाली अपहृत मुलगी (Kidnapping)
तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर निरीक्षक इंगळे व त्याच्या पथकातील अंमलदारांनी वेगवेगळ्या गुप्त मार्गाने, तसेच बातमीदारांच्या मदतीने सखोल तपास सुरू ठेवला. अखेर सातत्यपूर्ण शोधानंतर सदर अपहृत मुलगी मिळून आली. विशेष म्हणजे तिच्यासोबत तीन मुले होती. सर्वांना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंगळे यांच्यासह अंमलदार समीर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन, एस. एस. काळे यांच्या पथकाने केली.