Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

0
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

Ram Shinde : नगर : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या (ADCC Bank) 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की, या अगोदर मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी कधीच जिल्हा सहकारी बँकेमध्ये लक्ष दिलेले नव्हते, पण आता अलीकडच्या काळामध्ये मला या बँकेमध्ये लक्ष द्यावे वाटते व मी निश्चितपणे लक्ष या बँकेत देणार आहे, जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत आहे, जिल्हा बँकेने गेल्या काही वर्षांत तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे आशिया खंडातील अग्रगण्य व नावाजलेली सहकारी बँक म्हणून नगर जिल्हा बँकेची गणना होते. राज्यात अनेक बँका अडचणीत आहेत, पण नगर जिल्हा बँक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून यशस्वीपणे वाटचाल करत आहे. हा सर्व सभासद व संचालकांचा अभिमानाचा विषय आहे असे गौरवोद्गार काढत त्यांनी अनेक जणांवर निशाणा साधला.

Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

बँकेची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नगर जिल्हा सहकारी बँकेची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व बँकेच्या क्यूआर कोड सेवेचा शुभारंभ आयोजित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले ,आमदार मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, सुजय विखे, बाजीराव खेमनर, भानुदास मुरकुटे, अनुराधा नागवडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदीसह संचालक, सभासद उपस्थित होते.

Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, (Ram Shinde)

मी पहिल्यांदाच या सभेला आलो. सर्व संचालकांनी मांडलेल्या विषयांना अनुमोदन मिळाले, आणि एकही विरोधी सूचना न आल्याने बँकेच्या कामकाजाविषयी सदस्यांचा पूर्ण विश्वास दिसून आला. बँकेच्या शेतकरी हिताच्या धोरणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. पूर्वी ही बँक केवळ कारखान्यापुरती आहे, असा लोकांमध्ये गैरसमज होता. परंतु आज ही बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांची खरी ताकद बनली आहे. ऊस उत्पादकांपासून ते लहान शेतकऱ्यांपर्यंत, दूध उत्पादकांपासून ते बचत गटांपर्यंत – सर्वांसाठी बँकेने समतोल साधत कर्ज व मदत उपलब्ध करून दिली आहे, नुकत्याच झालेल्या बैठकीत १ कोटी ११ लाख रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली, कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेने सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले, कर्डिले हे कारखान्याचे नव्हे, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी आहेत. त्यांनी बँकेच्या कारभारात पारदर्शकता ठेवत शेतकऱ्यांच्या गरजांनुसार निर्णय घेतले. म्हणूनच या बँकेला जिल्हा आणि राज्यात आदर्श मानले जाते,” असे ते म्हणाले.

Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार सज्ज – पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची घोषणा

– नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून अशा काळात त्यांना आधार देण्याची हीच खरी वेळ आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. राज्य सरकारने 31 लाख शेतकऱ्यांसाठी तब्बल 2100 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केल्याचे सांगत, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनाम्यांद्वारे मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पालकमंत्री विखे म्हणाले की, नगर जिल्ह्यात कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की सातबारावर नोंद असलेल्या पिकांचीच नोंद पंचनाम्यात घ्यावी व सरसकट पंचनामे करावेत. जिल्ह्यातील मदतीचा आकडा मोठा राहणार आहे, काही ठिकाणी जीवितहानी टळली असली तरी पशुधनाच्याहानीची नोंद झाली, भविष्यातील नियोजनाचा आढावा घेताना जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पाण्याची तुटवडा जाणवणार नाही. गोदावरी खोऱ्यात 60 टीएमसी पाणी कसे आणता येईल, यासाठी नियोजन सुरू असून जायकवाडी धरणात प्रथम या उन्हाळ्यानंतर आवर्तन देऊनही 30 टक्के पाणीसाठा कायम होता,, यासाठीही नियोजन हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पुढील सात वर्षांत जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा विश्वास त्यांनी दिला.

याचबरोबर केटीवर बंधाऱ्यांमधील गळती थांबवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचेही विखे यांनी जाहीर केले. तसेच, प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. निळवंडे धरणाचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले असून पुढील महिन्यात सकलाई प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, सोसायट्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या योजना वापरून 150 उद्योग सुरू करता येतील. यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर मेळावे घेऊन प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बँकांनीही सोसायट्यांना मदत करावी,शेतकऱ्यांच्या हाती मदतीचा आधार पोहोचवण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे दुष्काळमुक्ती, सिंचन व उद्योगधंद्यांच्या वाढीचे मोठे नियोजन शासनाच्या पातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री विखे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचा विचार करण्याचा संदेश दिला.

आ. शिवाजीराव कर्डीले म्हणाले, “गेल्या काही वर्षांत जिल्हा बँकेला सलग तीन पुरस्कार मिळाले आहेत. पूर्वी ही बँक कारखानदारांच्या बँकेची ओळख होती, परंतु आता प्रत्यक्षात ‘शेतकऱ्यांची बँक’ म्हणून ही संस्था उभी राहिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज, सहकारी संस्थांना, पशुपालकांना, बचत गटांना तसेच साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करण्यात आला आहे. आजवर ६८९८ कोटींपेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट या सर्वांना जिल्हा बँकेने मदतीचा हात दिला. त्यामुळे बँकेवरील लोकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे,मात्र, केवळ कर्जवाटपावर समाधान न मानता त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणींवर भाष्य केले. “दरवेळी शेतकरी कर्ज घेतो, पण परतफेडीच्या वेळी तोच शेतकरी अडचणीत सापडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना केवळ तुटपुंजी मदत देऊन चालणार नाही. जर खरंच शेतकऱ्यांचे समाधान करायचे असेल, तर कर्जमाफी ही अपरिहार्य ठरणार आहे, असा ठाम पवित्रा कर्डीले यांनी घेतला.

Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे
Ram Shinde : जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत : सभापती राम शिंदे

मा.खा. सुजय विखे म्हणाले की, मागील तीन वर्षांत कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली असून कारखानदारांपुरती मर्यादित असलेली बँकेची ओळख शेतकरी व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहे. या टर्मची ही शेवटची सर्वसाधारण सभा असून पुढेही असाच चांगला कारभार सुरू राहावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

बँकेचे नाव आता अहिल्यानगर

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असे बँकेचे नाव पूर्वी होते आज या बँकेचे नाव बदलण्याचा ठराव करून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक असा निर्णय आज सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी अकरा लाख

शेतकऱ्यांना झालेली नुकसान पाहता जिल्हा सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता एक कोटी 11 लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केली.