Chhagan Bhujbal : आत्महत्या (Sucide) करण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नका, काळजी करू नका,आपलं आरक्षण (OBC Reservation) टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. मला खात्री आहे की,आम्ही त्यामध्ये विजय मिळवणार,असं आवाहन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी बांधवांना केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने थेट जीआर काढून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र, त्यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचे बघायला मिळाले आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत.
नक्की वाचा : ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने बीडच्या रिक्षा चालकाने उचललं टोकाचं पाऊल!
आपल्याला आरक्षणाच्या लढ्यात यश मिळणार (Chhagan Bhujbal)
छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, कोर्टात आम्ही पाच अर्ज दाखल केले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत. आमचे जे वकील आहेत, ते सांगतात की, आपल्याला यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही मार्गाने प्रयत्न करत असताना कोणीही आत्महत्येचा विचार करता कामा नये. किंबहुना सर्वांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येतील ते बघावे. आम्ही आता बीडला सभा घेतोय,तिथे या.
अवश्य वाचा: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग;जालना शहरात घडली घटना
‘लोकांना ओबीसींचा प्रचंड महासागर दाखवूया’ (Chhagan Bhujbal)
पुढे छगन भुजबळ म्हणाले, लोकांना ओबीसींचा प्रचंड महासागर दाखवूया. ओबीसीमधील वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत, ते देखील आपआपल्या परीने सभा घेत आहेत. मोर्चे काढत आहेत. महात्मा फुले परिषदेतर्फे देखील वेगवेगळ्या जिल्हांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे दिली जात आहेत. काही ठिकाणी लोक उपोषण देखील करत आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक ओबीसींच्या हक्कासाठी बाहेर पडले आहे. दलित समाज, मागासवर्गीय, आदिवासी या समाजाचा देखील आपल्याला पाठिंबा आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत. ३४० अंतर्गत ओबीसीमधील छोट्या छोट्या जातींना काही मदत केली,असे स्पष्ट म्हटले आहे. ३४१ मध्येही त्यांनी याची मांडणी केली असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.