Navratri Bhondla: नवरात्रीत भोंडला का खेळतात ? जाणून घ्या सविस्तर…

0
Navratri Bhondla:नवरात्रीत भोंडला का खेळतात ? जाणून घ्या…  
Navratri Bhondla:नवरात्रीत भोंडला का खेळतात ? जाणून घ्या…  

Navratri Bhondla: मंडळी नवरात्रात (Navratri) जसं आपण गरबा आणि दांडिया खेळतो ,तसचं महाराष्ट्रात (Maharashtra) नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशीही भोंडला (Bhondala) खेळण्याची प्रथा (Custom) आहे. मात्र काळाच्या ओघात ही परंपरा च नव्हे तर भोंडला हे नाव देखील लुप्त होत चालल्याचे पाहायला मिळतंय. भोंडला’ हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापने सोबत ‘भोंडला’ या खेळाला सुरुवात होते. मात्र हा भोंडला का आणि कसा खेळतात जाणून घेऊ सविस्तरपणे… 

नक्की वाचा: मोठी बातमी!आता लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज!  

भोंडला नेमका कसा साजरा करतात ? (Navratri Bhondla)

आपल्याकडे हत्तीला समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. म्हणूनच पहिल्यांदा एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. नंतर त्या हत्त्तिच्या चित्राभोवती समवयस्क मुली, महिला फेर धरून भोंडल्याची सुंदर अशी गाणी म्हणतात. या भोंडल्याच्या गाण्यातून महिला सासु-सासरे,नणंद- भावजय, पती, दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन आनंद साजरा करतात. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा’ ह्या गाण्यापासून हा भोंडला सुरु होऊन रोज एक-एक गाणं वाढवत दसऱ्याला दहा गाणी म्हटली जातात. 

अवश्य वाचा: ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने बीडच्या रिक्षा चालकाने उचललं टोकाचं पाऊल!

महिलांसाठी खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम  (Navratri Bhondla)

भोंडल्याची ही गाणी म्हणून झाल्यावर येते खिरापत.जिच्या घरी भोंडला असेल तिच्या घरी ती खिरापत करते.त्यामुळॆ रोज वेगळे घर रोज वेगळी खिरापत असते. गाणी म्हटल्यावर ‘खिरापत ओळखणे’ हा मोठा मजेशीर कार्यक्रम याठिकाणी असतो. त्यामुळे पटकन न ओळखू येणारी खिरापत करणे ह्यात घरातील गृहिणीचे पाककौशल्य पणाला लागते.

पूर्वी आश्विन महिना आला की अशा खेळांच्या माध्यमातून भोंडला,हळदीकुंकू या सगळ्यांमुळे महिलांना  विरंगुळा मिळायचा. घरोघरीच्या स्त्रिया, मुली एकत्र खेळायला आल्याने त्यांच्यातील संवाद,ओळख वाढायची, त्यामुळे रोजची काम करून थकून गेल्यानंतर या खेळांमुळे स्त्रियांना नवा उत्साह मिळायचा, मात्र आजच्या आधुनिक युगात, स्पर्धेच्या जमान्यात महिलांना अजिबात वेळ मिळत नाही. ताणतणाव देखील दिवसेंदिवस वाढत चाललंय. मात्र तरीदेखील त्तुम्ही थोडासा वेळ काढून भोंडला खेळू शकता आणि आनंद साजरा करू शकता.