District Collector : नगर : महिला व बालविकास विभागामार्फत (Women and Child Development Department) राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी (District Collector) डॉ. पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कृष्णा एम. सोनवणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. कदम, पोलीस उपअधीक्षक जगदीश भांडाळ, बालकल्याण विकास अधिकारी नारायण कराळे, डॉ. सोनाली बांगर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहरकर, परिविक्षा अधिकारी योगिराज जाधव यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
नक्की वाचा : दगडफेक प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले,
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५” या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कायद्यांतर्गत पीडित महिलांना तक्रार कुठे करावी याची अनेकदा माहिती नसते. महिलांना तक्रार करणे सुलभ व्हावे, यासाठी संबंधित तालुका व जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, अंगणवाडी व नागरिकांची वर्दळ असलेल्या सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात लावावेत. महिला हेल्पलाइन क्र. १८१ व बालकांसाठी १०९८ बाबत व्यापक जनजागृती करावी.
अवश्य वाचा: लालपरीचा प्रवास महागला;एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय
सर्व कार्यालयात समित्या स्थापन करण्याच्या सूचना (District Collector)
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायद्यांतर्गत सर्व कार्यालयात अंतर्गत समित्या स्थापन होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. कदम यांनी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती पॉवरपॉइंटच्या माध्यमातून सादर केली. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.