Dada Patil Mahavidyalaya : कर्जत : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा विभाग (District Sports Department) आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या (Dada Patil Mahavidyalaya) खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवत १५ सुवर्णपदके व सात रौप्यपदकांसह तीन सांघिक क्रीडा प्रकारात यश मिळवले.
अवश्य वाचा: सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत क्रिकेट मुले (१९ वर्षे वयोगट) प्रथम क्रमांक व कबड्डी मुली (१९ वर्षे वयोगट) या संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा पातळीवरती झेप घेतलेली आहे. तर खो-खो स्पर्धेत मुलांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले आहे. यासह सपना शिवाजी मासाळ, अश्विनी जगताप, अक्षदा शिवाजी श्रीराम, भाग्यश्री प्रकाश धनवडे या विद्यार्थिनींनी रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हापातळीवर निवड झाली.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांचा कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या
अनेक विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी (Dada Patil Mahavidyalaya)
वैयक्तिक तालुकास्तरीय क्रीडा प्रकारांमध्ये शुभांगी बनारसी गुप्ता तायक्वांदो स्पर्धेत प्रथम, भाग्यश्री प्रकाश धनवडे (५० किलो वजनी गट) व मानसी जालिंदर काळे (७४ किलो वजनी गट) कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. योगेश खताळ याने ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. भाग्यश्री प्रकाश धनवडे गोळा फेक (१९ वर्ष वयोगट) स्पर्धेत प्रथम व १०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हा पातळीवर निवड. राजनंदिनी बाळासाहेब मोढळे, गोळा फेक (१७ वर्ष वयोगट) स्पर्धेत प्रथम क्रमांक व जिल्हा पातळीवर निवड. दीक्षा आनंदराव जाधव हिने २०० व ८०० मीटर धावणे व भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त व जिल्हा पातळीवर निवड. अश्विनी जगताप, ४०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक व जिल्हा पातळीवर निवड. विशाल रणवरे, जिल्हास्तरीय ऊशु स्पर्धेत प्रथम क्रमांक व विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांबरोबरच वरिष्ठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत झालेल्या कुस्ती व ज्युदो स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविलेले आहे. यात हर्षवर्धन पठाडे, फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत (८६ किलो वजनी गट) सुवर्णपदक, स्वप्निल चव्हाण, ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत (७२ किलो वजनी गट) सुवर्णपदक, युवराज मुरकुटे, फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत (६१ किलो वजनी गट) रौप्यपदक प्राप्त केले आहे. तसेच या खेळाडूंनी ज्युडो स्पर्धेत दोन सुवर्णपदके प्राप्त करून त्यांची निवड विभागीय पातळीवर झालेली आहे. शालेय व विद्यापीठस्तरीय क्रीडा प्रकारांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, बप्पाजी धांडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.