Akole : अकोले : तालुक्यात महातपस्वी अगस्ति ऋषींचा आश्रम असून, त्यांचे स्मरण म्हणून अकोले (Akole) तालुक्याचे नामांतर करून ‘अगस्तिनगर’ (Agastinagar) असे करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता भीमाजी सदगीर (Datta Bhimaji Sadgir) यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
अवश्य वाचा: सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात
तालुक्याला धार्मिक व पौराणिक पार्श्वभूमी
आमदार डॉ. किरण लहामटे व तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ज्यावेळेस सर्व राक्षस समुद्रामध्ये लपून बसले होते. त्यावेळेस सर्व देवतांनी अगस्ति ऋषींचा धावा केला व त्यांना विनंती केली. त्यांनी त्याचा मान राखत धर्मरक्षणासाठी एका आचमणात संपूर्ण समुद्र पिऊन टाकला. यामुळे लपलेल्या दैत्यांचा विनाश करता आला. यामुळेच धर्म वाचला असे महातपस्वी अगस्ति ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीराम देखील येवून गेलेले आहे. भगवान शंकराचे वरदान असलेल्या रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना दिव्य शक्तीबाण याच भूमीतील अगस्तिमुनींनी दिला, त्याच बाणाने रावणाचा वध झाला हा इतिहास रामायणात आलेला आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांचा कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या
हिंदू जनतेची देखील मागणी (Akole)
याच भूमीत श्रीरामांचे पूर्वज सत्यवान राजा हरिश्चंद्र देखील होवून गेले आहे. त्यांच्या नावाचा हरिश्चंद्रगड आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहे. पूर्वी येथील पिके उध्वस्त करण्यासाठी कोल्हे येत असे म्हणून शेतकरी ‘आले कोल्हे गेले अकोले’ असे म्हणत ‘अकोले’ हे नाव पडले. परंतु इतके महान तपस्वी या भूमीत जर होवून गेले असेल तर या तालुक्याचे नामांतरण होणे खूप गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील हिंदू जनतेची देखील मागणी असून ‘अगस्तिनगर’ असे नाव ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता सदगीर यांनी केली आहे.