Vijayadashami : कळसूबाई शिखरावर दसरा उत्साहात साजरा

Vijayadashami

0
Vijayadashami : कळसूबाई शिखरावर दसरा उत्साहात साजरा
Vijayadashami : कळसूबाई शिखरावर दसरा उत्साहात साजरा

Vijayadashami : अकोले : महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई (Kalsubai) शिखरावर गेली सलग 29 वर्षे घोटी शहरातील कळसूबाई मित्रमंडळ नवरात्रीत (Navratri) घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत (Vijayadashami) दररोज चढाई करून शिखरस्वामिनी कळसूबाई मातेचरणी नतमस्तक होत असतात. यंदा देखील ही परंपरा जपत दसरा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला.

अवश्य वाचा: अकोले तालुक्याचे ‘अगस्तिनगर’ नामांतर करा : सदगीर

पाऊस आणि जोरदार वारा उपक्रम उत्साहात

यंदा मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असतानाही शिखरप्रेमी, शिवप्रेमी व गडप्रेमी गिर्यारोहकांनी हा परंपरेचा उपक्रम उत्साहात पार पाडला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या दिवशी कळसूबाई मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या घटकलशाचे विसर्जन करून मातेचा दुग्धाभिषेक व महाआरती केली. त्यानंतर गिर्यारोहकांनी भक्तांना आपट्याची पाने देत गळाभेटी घेतल्या आणि शुभेच्छा देत दसरा मोठ्या भक्तीभावात साजरा केला.

नक्की वाचा : महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

मातेची अखंड सेवा करण्याचा संकल्प यंदाही पूर्ण (Vijayadashami)

नवरात्रीतील नऊ दिवस शिखरावर जाऊन मातेची अखंड सेवा करण्याचा संकल्प यंदाही पूर्ण झाला आणि पुढील वर्षी पुन्हा नव्या जोमाने हाच परंपरेचा वारसा सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. या उत्सवात मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, नीलेश आंबेकर, प्रवीण भटाटे, काळू भोर, नीलेश पवार, बाळू आरोटे, अशोक हेमके, सोमनाथ भगत, भगवान तोकडे, कैलास नवले, बाळू भोईर, राजेंद्र माने, विकास जाधव, ज्ञानेश्‍वर मांडे, गणेश काळे, भाऊसाहेब जोशी, श्रावण सोपे, गुरुनाथ आडोळे, चेतन जाधव, चेतन छत्रे, नामदेव जोशी, नाना टाकळकर, कृष्णा वाहुले, यश हेमके, सोनू गिते, शुभम जाधव, किरण अहिरे, दीपक आरोटे, राजू मराडे, हरीश आतकरी, समाधान बिन्नर यांच्यासह इतर गिर्यारोहकांनी सहभाग घेतला.