Dnyaneshwari Munde: बीड परिसरात (Beed)दसऱ्यानिमित्त दोन मेळावे पार पडले. या दोन्ही दसरा मेळाव्यानंतर बीडमधील राजकारण ढवळून निघण्याची दाट शक्यता आहे. त्यातच महादेव मुंडे खून (Mahadev Munde Murder) प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी पोलिसांच्या आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेसाठी नवा नियम;पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
मुंडे खून प्रकरणात एवढं दडलंय काय? (Dnyaneshwari Munde)
महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी तपास यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरले. २१ ऑक्टोबरला महादेव मुंडे यांच्या खूनाला दोन वर्ष होत आहेत. २३ महिने उलटून गेले तरीपण आरोपी अजून पकडलेले नाहीत. एका गरीब कुटुंबाने मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणे ही काय सहज गोष्ट नाही. या खून प्रकरणात आरोपीच निष्पन्न होत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे, असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विचारला. मारलं तर मारलं, कोणी देवाने येऊन मारलं का? मारलं तर इथल्याच कोणीतरी असेल ना तरीपण हे पोलीस प्रशासन आरोपी पर्यंत पोहोचत नाही, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला. कुठलेही टोकाचे पाऊल जरी आले तरीही मी माझ्या नवऱ्यासाठी लढतच राहणार असा इरादा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बोलून दाखवला आहे.
अवश्य वाचा: पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाची जोरदार धडक; रिक्षाचे झाले दोन तुकडे
आमच्या विश्वासाला तडा देऊ नका (Dnyaneshwari Munde)
मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि स्वतः आम्ही पंकज कुमावत यांच्यावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्र्यांकडून त्यांची नियुक्ती करून घेतली. आम्हाला पंकज कुमावत यांच्यावर अजून पण विश्वास आहे. पण आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अजून मला माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी संघर्ष करावा लागेल ही वेळ येऊ देऊ नका. दोन महिने झाले. एसआयटी काय करते, काय नाही काही माहिती नाही. मग आरोपी कधी अटक करणार आणि मुख्यमंत्र्यांनी पण एसआयटीचा फॉलोअप घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.