Ajit Pawar : शेतकरी बांधवांनो नाउमेद होऊ नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी: अजित पवार

Ajit Pawar : शेतकरी बांधवांनो नाउमेद होऊ नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी: अजित पवार

0
Ajit Pawar : शेतकरी बांधवांनो नाउमेद होऊ नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी: अजित पवार
Ajit Pawar : शेतकरी बांधवांनो नाउमेद होऊ नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी: अजित पवार

Ajit Pawar : पारनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. “शेतकरी बांधवांनो, नाउमेद होऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे ठाम आश्वासन देत त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Damage Compensation) देण्याची घोषणा केली. पारनेर येथे आयोजित रोजगार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

अवश्य वाचा: अकोले तालुक्याचे ‘अगस्तिनगर’ नामांतर करा : सदगीर

शेतकरी बांधवांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई

मागील काही दिवसांत संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. शेतकरी बांधवांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बँकांनाही महत्त्वाचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी कोणत्याही बँकेने त्यांना त्रास देऊ नये, यासाठी सर्व बँकांना निर्देशित करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नक्की वाचा : महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

अनेक मान्यवर उपस्थित (Ajit Pawar)

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पारनेर आमदार काशीनाथ दाते होते. माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप जिल्हा कार्यकारणी विश्वनाथ कोरडे, भाजप मंडकाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन वराळ, सुधामती कवाद, संदीप ठुबे, भाजपा जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, दत्तात्रय रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.