नगर : सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे करमाळा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे (Mahesh Chivte) यांना ही बेदम मारहाण (Brutal beating) झाली आहे. महेश चिवटे हे मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांचे मोठे बंधू आहेत. मंगेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
नक्की वाचा: महादेव मुंडे खून प्रकरणात आरोपी अजून मोकाट का? ज्ञानेश्वरी मुंडेंचा राज्य सरकारला थेट सवाल
नेमकं काय घडलं ?(Solapur Crime)
महेश चिवटे हे शनिवारी सकाळी शेतातून घराकडे जात असताना रस्त्यात अडवून त्यांना ही मारहाण केली. मनोज लांडगे या तरुणाने ही मारहाण केल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. हा हल्ला झाल्यानंतर करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे.
अवश्य वाचा: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार;’या’ तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
महेश चिवटेंचा गंभीर आरोप (Solapur Crime)
सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी माजी मंत्री दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सुपारी देऊन संपवण्याचा डाव बागल परिवार करत असल्याचा गंभीर आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी मनोज लांडगे याला सुपारी दिली आणि मनोज लांडगे याने महेश चिवटे हे शेतातून येताना त्यांची गाडी अडवून मारहाण केल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे.