Shubman Gill:रोहित शर्माऐवजी शुबमन गिल करणार वनडे संघाचं नेतृत्व;बीसीसीआयची घोषणा  

0
Shubman Gill:रोहित शर्माऐवजी शुभमन गिल करणार वनडे संघाचं नेतृत्व;बीसीसीआयची घोषणा  
Shubman Gill:रोहित शर्माऐवजी शुभमन गिल करणार वनडे संघाचं नेतृत्व;बीसीसीआयची घोषणा  

Shubman Gill : क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने (BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय (One Day Match) आणि टी-२० (T-20) मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. तसेच बीसीसीआयने एकदिवसीय कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी शुबमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचं नेतृत्व (New Captain) करणार आहे. तर श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादव टी २० संघाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

नक्की वाचा: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

रोहित शर्मा संघात असताना गिल कॅप्टन (Shubman Gill)

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळणार आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआय निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीसह टीम इंडियाच्या भविष्याबाबत ही चर्चा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यात शुबमनच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर कर्णधार म्हणून शुबमनच्या नावाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहलीचाही या संघात समावेश आहे. तर केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी मिळाली आहे.

अवश्य वाचा: एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंच्या भावावर हल्ला

शुभमन गिलची दमदार कामगिरी  (Shubman Gill)

शुबममने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्येही सातत्याने खेळतोय. शुबमन तिन्ही फॉर्मेटसाठी सेट आहे. तो फॉर्मेटनुसार खेळतो. ही वैशिष्ट्य पाहता शुबमनला कर्णधार करण्यात आलं आहे,अशी माहिती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शुबमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे तो रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो अशी चर्चा होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर होताच यावर शिक्कामोर्तब झाला आहे.