Crime : नगर : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पुण्यात एका कंपनीत काम करत असलेल्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) जहीद फारुख तांबोळी (रा. केडगाव) याच्या विरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी
इंस्टाग्राम व मोबाईल च्या माध्यमातून संपर्कात
पिडीत तरुणी गेल्या ४ वर्षांपासून इंस्टाग्राम वापरत असून त्यावरच तिची संशयित आरोपी जहीद तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे इंस्टाग्राम च्या माध्यमातून तसेच मोबाईल च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. गतवर्षी ती तरुणी काम शोधण्यासाठी नागपूर हून पुण्यात गेली, तेंव्हा जहीद तिला भेटायला पेरणे फाटा येथे गेला होता. त्यानंतर त्यांचे फोन वर नेहमी संभाषण होत होते.
नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र
मनाविरुद्ध केला अत्याचार (Crime)
जहीद हा तिला आपण लग्न करू,असे वारंवार म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्यास होकार कळविला व १६ सप्टेंबर रोजी पहाटे त्याला पहिल्यांदा भेटण्यासाठी ती बसने नगरमध्ये आली. त्यावेळी पुणे बसस्थानकावरून त्याने तिला दुचाकीवर केडगाव येथे त्याच्या एका पान शॉप येथे नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर त्या पान टपरीत तिला कोंडून ठेवले. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास दौंड रोडवरील एका लॉज मध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढला असता. नंतर पाहू, तू आता पुण्याला जा असे सांगून तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. तिला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.