AMC : महापालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियान

AMC : महापालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियान

0
AMC : महापालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियान
AMC : महापालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियान

AMC : नगर : अहिल्यानगर शहरामध्ये डेंगू (Dengue) मुक्त अभियान सुरू असून, १७ आठवड्यामध्ये १८ हजार ७२२ घरांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये ५१ हजार ८०० पाणीसाठे तपासले असून ७१२ डेंग्यू सदृश्य अळया आढळून आल्या असता पाणीसाठे नष्ट करत औषध फवारणी केली आहे. त्यामुळे डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे प्रतिपादन महापालिका (AMC) आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.

अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी

घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी

अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियानानिमित्त नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, मुख्याध्यापिका नंदा कानिटकर, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, डॉ. सृष्टी बनसोडे, हिवताप आरोग्य निरीक्षक पुरुषोत्तम आडेप आदीसह विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र

माजी उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या की, (AMC)

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजना कागदावर न ठेवता त्या जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करत आहे. नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जनजागृती केल्याने आजाराचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले आहे. तसेच तोफखाना आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी चांगले काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.