Illegal Slaughterhouses : शेवगाव : शेवगाव शहरातील खाटीक गल्ली येथे अवैधरीत्या गोवशी जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारे अवैध कत्तलखाने (Illegal Slaughterhouses) उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईत ३ लाख ७८ हजार १५० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत (Seized) करण्यात आला आहे. ही कारवाई नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या (Police Administration) वतीने करण्यात आली.
अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी
३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
या प्रकरणात शाकीब बाबू कुरेशी (फरार), अन्वर शेख अन्वर मोहम्मद (६०), वाहीद हारुन कुरेशी (४८) व हमजा वाहीद कुरेशी (२७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव येथील खाटीक गल्लीत अवैध गोमांस विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ७५ किलो ते ४०० किलो वजनाचे गोमांस, धारदार शस्त्रे, वजन काटे, जनावरांची चरबी काढण्याचे यंत्र, जनावरांची कातडी, मोबाईल फोन, रोख रक्कम, तसेच दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र
यांच्या पथकाने केली कारवाई (Illegal Slaughterhouses)
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे, अंमलदार आजिनाथ कोठाळे, प्रवीण महाले, रामहरी खेडकर, चंद्रकांत कुसारे, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, संतोष वाघ, राहुल खेडकर, रोहीत पालवे, नवनाथ कोठे, एकनाथ गरकळ, गितांजली पाथरकर यांच्या पथकाने केली.