Kisan Sabha : अकोले: तालुक्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र (Soybean Purchasing Center) नसल्यामुळे शेतकर्यांना सरकारच्या हमीभाव योजनेचा लाभ होत नाही. इतर तालुक्यात सोयाबीन केंद्रांवर सोयाबीन घेऊन जाण्याचा खर्च जास्त असल्याने तालुक्यातील शेतकरी हमीभावापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीमध्ये अकोले बाजार समितीमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी किसान सभेने (Kisan Sabha) आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांच्याकडे केली आहे.
अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी
अगस्ति कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न
नुकतीच अगस्ति कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत ऊस उत्पादकांनी उपस्थित केलेले मुद्दे कारखान्याच्या कारभाराबद्दल चिंता व्यक्त करणारे आहेत. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प कुणालाही विश्वासात न घेता रोजंदारीसाठी इतरांना चालवायला दिला आहे. कारखान्याच्या जमिनीवर सोलर पॅनेल सुरू करण्याचे कॉन्ट्रॅक्ट सभासदांना व शेतकर्यांना विश्वासात न घेता केले जात आहे. मागील सर्वसाधारण सभेमध्ये दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी किसान सभेने केली होती. मात्र याबाबत वर्षभरात काहीही झालेले नाही.
नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र
आमदारांनी जनतेला स्पष्टीकरण देण्याची मागणी (Kisan Sabha)
मते मागण्यासाठी किसान सभेची सत्ताधार्यांना कारखाना निवडणुकीत गरज होती. मात्र ती गरज संपल्यानंतर महाविकास आघाडीला सोडून अनेक लोक आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेच्या वळचणीला गेले व वेगळी चूल मांडली. आता निर्णय घेतानाही तेच सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण आमदारांनी जनतेला द्यावे, असे आवाहन किसान सभा करत आहे.