Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम

Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम

0
Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम
Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम

Tree Planting : कर्जत : कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या पर्यावरण संवर्धनाच्या (Environmental Conservation) श्रमदानास पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंचवार्षिक पूर्तीचे औचित्य साधत शहरातील भांडेवाडी बायोडायव्हरसिटीत अवघ्या अर्ध्या तासात विक्रमी (Record) ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण (Tree Planting) करण्यात आले. यावेळी श्रमप्रेमींनी ५ वर्षे अंक मानवी साखळीतून साकारत आपल्या कार्याचा जल्लोष केला.

Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम
Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम

अवश्य वाचा : शेवगाव मधील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त; पोलीस, नगरपरिषदेची कारवाई

पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

मागील पाच दिवसांपासून कर्जत शहरात पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०२० पासून पर्यावरण संवर्धनासाठी कर्जतच्या ध्येयवेडया श्रमप्रेमीं एक मोट बांधत स्वच्छ, सुंदर आणि हरीत कर्जतसाठी स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा स्पर्धेत लीलया काम करण्याचे ध्येय आजमितीस पूर्ण करीत आहे. कोरोना काळात देखील या श्रमप्रेमींनी आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवत घेतलेला वसा खाली ठेवला नाही. याच पर्यावरण संवर्धन कार्यास यंदा पाच वर्षे पूर्ण होत असल्याने मागील पाच दिवसांपासून विविध जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले.

Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम
Tree Planting : कर्जतमध्ये ५ हजार ५५५ वृक्षांचे रोपण; सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम

नक्की वाचा : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल

राजेंद्रसिंह यांचे पर्यावरण संवर्धन वाख्यान संपन्न (Tree Planting)

बुधवारी कर्जत शहराची स्वच्छता, गुरुवारी पर्यावरण जनजागृती सायकल रॅली, शुक्रवारी वृक्षदिंडी यासह झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरण जनजागृती पथनाट्य, शनिवारी राजस्थान राज्याचे जलपुरुष राजेंद्रसिंह यांचे पर्यावरण संवर्धन वाख्यान संपन्न झाले. रविवारी, सकाळी ७ वाजता सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमींसह शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पर्यावरण प्रेमींनी अवघ्या अर्ध्या तासात कर्जत शहरातील भांडेवाडी वनविभागाच्या बायोडायव्हरसिटीत ५ हजार ५५५ देशी वृक्षांचे रोपण करीत उत्सव महाश्रमदानाचा साजरा केला. यावेळी पंचवर्षंपूर्तीनिम्मित मानवी साखळीतून ५ वर्षे अंक उपस्थित सर्व श्रमप्रेमींनी साकारत आपल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा जल्लोष केला. या कार्यक्रमास नाशिक प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी, कर्जतचे वनपरीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर यांच्यासह सर्व राजकीय पदाधिकारी, निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्व सामजिक संघटनेच्या शिलेदारांनी १ हजार ८३० दिवस आपल्या श्रमदानातून ६ घनवन प्रकल्प उभारले असून यात हजारो विविध देशी वृक्षांची लागवड केली आहे. यासह कर्जत शहर, उपनगर आणि शहरातून जाणाऱ्या सर्वच रस्त्यास दुतर्फा झाडे लावली. लेकीचं झाड, वड रोड संकल्पना, पर्यावरण जनजागृती सायकल रॅली तसेच लावलेल्या झाडांना लोकसहभागातून संरक्षक जाळी लावत त्याची निगा राखली जात आहे. पाण्याचे जलस्रोत नदी, नाले, ओढे, बारव, विहिरी, बंधारे स्वच्छता मोहीम पार पाडली आहे.


स्वच्छ, सुंदर आणि हरीत कर्जतसाठी ध्येयवेडे झालेले या श्रमप्रेमींनी स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा या स्पर्धेत क्रांती घडवत कर्जत शहराचा कायापालट केला आहे. देशी झाडे लावत त्याची निगा राखण्याचे काम इमाने-इतबारे पार पाडत आहे. पिवळा टी शर्ट या सर्व सामाजिक संघटनेची ओळख असून या सेनेचे काम सातासमुद्राच्या पलीकडे पोहचले आहे. माझ्या वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च पातळीवरील जागतिक पर्यावरण बदल परिषदेत सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमदानाची चित्रफीत दाखवली गेली होती. जगभरातील एकूण २०० हून अधिक देशांचा या परिषदेत सहभाग होता.