Heavy Rain : आपत्तीत नुकसान झालेल्या ४ लाख ३५ हजार बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

Heavy Rain

0
Heavy Rain : आपत्तीत नुकसान झालेल्या ४ लाख ३५ हजार बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण
Heavy Rain : आपत्तीत नुकसान झालेल्या ४ लाख ३५ हजार बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

Heavy Rain : नगर : सप्टेंबर महिन्यांत नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १ हजार ३११ गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी (Heavy Rain), पूराचा (Floods) फटका बसला आहे. या पावसात ५ लाख ७६ हजार ८७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून (Revenue Department) बाधितांचे पंचनामे सुरु केले असून आज अखेरीस ४ लाख ३४ हजार ८१२ हेक्टरचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

८ लाख ३४ हजार ९७० शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस, तूर, मूग, उडीत, सूर्याफुल, मका, कापूस, बाजरी, केळी, फुलपिके, चारापिके, फळपिके, लिंबू, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १३ ते २९ सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. या काळात १ हजार ३११ गावांतील ८ लाख ३४ हजार ९७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने खरीप हंगामातील जवळपास ५० टक्क्यांहून अधिक पिके वाया गेली असून, पावसाने उघडीप दिल्याने महसूल व कृषी विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यात ३३ हजार ३३८ शेतकऱ्यांचे २० हजार ३४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या आत तर ८ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे ५ लाख ५६ हजार ८४५ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे

जिल्ह्यात अकोले तालुक्यातील (Heavy Rain)

तर कर्जत तालुक्यात सर्वाधिक ३२ हजार ६४५ हेक्टरवरील १०० टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील १३७ गावातील ७१ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावरील, नेवासा तालुक्यातील ४९ हजार २२२ हेक्टरवरील ९२.४४ टक्के शेतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत. तर पंचनामे पूर्ण झाल्याची सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्यातील असून या ठिकाणी आतापर्यंत ३ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेले असून कोपरगाव तालुक्यात १५ हजार ३१० (४६.३४ टक्के) पारनेर तालुक्यातील ३२ हजार ३३७ (५४.१६ टक्के) व राहाता तालुक्यात २२ हजार ३०८ (५५.६८ टक्के) हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. याशिवाय अहिल्यानगर तालुक्यात ४१ हजार ४०९ (७३.९२ टक्के), जामखेड २८ हजार ४०० (८२.७४ टक्के), श्रीगोंदा २६ हजार ७०० (६७. ५४ टक्के), श्रीरामपूर २७ हजार ४६४ (७७. ८२ टक्के), राहुरी ३५ हजार ९५० (८०.७१ टक्के), शेवगाव ४८ हजार ९८४ (८०. ७१ टक्के) हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.