Kisan Sabha : अकोले: राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व नुकसानीची रास्त भरपाई सर्व नुकसानग्रस्तांना द्या. या प्रमुख मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी (ता.१०) राज्यभर आंदोलन (Movement) करण्याची हाक देण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान सभा (Akhil Bharatiya Kisan Sabha) , सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) व अखिल भारतीय शेतमजूर यूनियन या संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माकपचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी दिली.
अवश्य वाचा : शेवगाव मधील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त; पोलीस, नगरपरिषदेची कारवाई
ओला दुष्काळ केंद्रस्थानी आणला जाणार
ओल्या दुष्काळासंदर्भातील मागण्यांबाबत या तीनही संघटनांनी नुकताच मराठवाड्याचा संयुक्त दौरा केला. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचा छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आता या आंदोलनाचा विस्तार करत संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर १० ऑक्टोबरला मोर्चे काढून ओला दुष्काळ केंद्रस्थानी आणला जाणार आहेत.
नक्की वाचा : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल
प्रतिएकर 50 हजार रुपये भरपाई द्या (Kisan Sabha)
शेतकर्यांना प्रतिएकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये द्या, शेतकर्यांचे व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, कर्जमाफी योजनेत पीक व शेती कर्जाबरोबरच बचत गट, सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, शेती, जनावरे, घरे, गोठे यांचे झालेले नुकसान सरकारी खर्चाने रोजगार हमी योजनेतून कामे काढत भरून द्या. यासारख्या १० मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेती व मातीचे प्रश्न केंद्रस्थानी राहावेत यासाठी या तीनही संघटना एकोप्याने रणांगणात उतरल्या आहेत. शुक्रवारच्या राज्यव्यापी आंदोलनानंतरही सरकारने वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा डॉ. अशोक ढवळे, नरसय्या आडम, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, नथू साळवे, मारोती खंदारे, उमेश देशमुख आदिंनी दिला आहे.