NCP : नगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि आगामी दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल
यावेळी उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, प्रा. आशा निंबाळकर, माणिकराव विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, विपुल शेटीया, सुनील त्रिंबके, सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, संजय चोपडा, युवराज शिंदे, सारंग पंदाडे, वैभव ढाकणे, प्रा. अरविंद शिंदे, अमोल गाडे, लता पवार, बाळासाहेब पवार, सागर गुंजाळ, अमित खामकर, साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, भरत गारुडकर, सुनंदा शिरोळे, मयुरी गोरे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, सतीश ढवन, राजेश कातोरे आदी उपस्थितीत होते.
अवश्य वाचा : शेवगाव मधील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त; पोलीस, नगरपरिषदेची कारवाई
महिलांच्या सुरक्षेची मागणी (NCP)
शहरात दररोज वाहतूक कोंडी होत असून दसऱ्याच्या काळातही नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर कठोर कारवाई करून महिलांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील दिल्लीगेट, प्रेमदान चौक, माळीवाडा एसटी स्टँड, भिस्तबाग, कायनेटिक चौक आणि भिंगार येथील मुख्य चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत, सर्व सिग्नल कार्यान्वित करावेत, तसेच नाकाबंदी करून बिननंबर, फॅन्सी नंबर आणि आवाज करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
“वाहतूक कोंडी ही फक्त पोलिसांची जबाबदारी नसून, सर्व घटकांच्या सहकार्याची गरज आहे. ब्लॅक स्पॉटवर नाकाबंदी केली जाणार असून संध्याकाळी सात ते बारा या वेळेत ठिकठिकाणी तपासणी सुरू राहील. आमच्याकडे कर्मचारी अपुरे असले तरी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने शहरातील सर्व सिग्नल सुरू करावेत आणि रस्त्यावरील अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीट लाईट्स तातडीने सुरू कराव्यात,” पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे