Lata Mangeshkar : नगर : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या (Shri Gurumauli Sangeet Vidyalaya) वतीने भारतरत्न (Bharat Ratna) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जन्मदिनी त्यांच्या मराठी व हिंदी गाण्यांच्या स्वरसुगंधात स्वरांजली हा कार्यक्रम साजरा झाला. आपल्या सुमधूर स्वरांच्या द्वारे चिरकाल चिरंजीव असलेल्या या गानसरस्वतीचे स्मरण व्हावे म्हणून खास लोकाग्रहास्तव श्री गुरु माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने लतादीदींच्या मराठी व हिंदी गाण्यावर ‘स्वरांजली’ (Swaranjali) ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘मेरी आवाजही पहचान है’ या गीताचा साक्षात्कार असणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर होय !
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवर
प्रसिद्ध उद्योजक राजेंद्रजी चोपडा, रवींद्रजी बक्षी, डॉ प्रकाशजी गरूड डॉ. हेमंतजी नाईक, उद्योगपती श्री निर्मलजी खंडेलवाल, डॉ. सागर कड, भारत भारतीचे अध्यक्ष रमेशजी रासने, अशोक गांधी-जरिवाला , डॉ. दमन काशिद, धनेश बोगावत, विलास बडवे योगेश पंडित ज्ञानेश शिंदे या मान्यवरांनच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
भरतनाट्यमच्या विद्यार्थीनींचे अप्रतिम नृत्याविष्कार सादर (Lata Mangeshkar)
विद्यालयाच्या संचालिका सौ वर्षा चंद्रकांत पंडित यांनी गायलेल्या व ह्या कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन केलेल्या माय भवानी तुझे लेकरू या गाण्यावर विद्यालयाच्या भरतनाट्यमच्या विद्यार्थीनींनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची जोरदार सुरुवात केली. या गाण्यानंतर, लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर मधील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणारे शबरी केटरिंग सर्व्हिसेस चे श्री.के.के.शेट्टी, नगरचे सुप्रसिध्द मुर्तीकार श्री. प्रमोद कांबळे व सुप्रसिध्द चित्रकार अनुराधा ठाकूर या थोर नामांकित तीन विभूतींचा
श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मा. राजेंद्रजी चोपडा, मा. रवींद्रजी बक्षी, डॉ. प्रकाश गरुड चंद्रकांत पंडित व वर्षा पंडित यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगाचे औचित्याने गोव्याचे कवी श्री पद्माकर वांजळे यांच्या पद्मरत्न या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन सौ वर्षा पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पद्माकर वांजळे यांचे सह बाल लेखक चि. श्रीयांश घोडके यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन प्रसादजी बेडेकर यांनी केले.
या नंतर झालेल्या स्वरांजली या सुरेल मैफिलीत प्रमुख गायीका गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी वर्षा पंडित आणि पुण्याचे गायक जितेंद्र जी भुरुक यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांना तबला आणि ढोलकीवर अजित गुंदेचा व ललित भूमकर, बासरीवर पुण्याचे अविनाश मातापुरकर, सिंथेसायझरवर दिलावर शेख व चिन्मय कारेकर, आक्टोपॅडवर निलेश सोज्वळ व गिटार अजित कुमार मुंबई यांनी उत्तम साथसंगत केली.
सुरेल गायन, नृत्य या बरोबरच वादकांच्या उत्तम वादनाचीही भर पडली संगीताच्या तीनही बाजू समर्थ पणे सादर झाल्या. या मैफलीत निवेदन पुण्याचे मिलिंदजी कुलकर्णी यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले. त्यामुळे कार्यक्रम अतिशय श्रवणीय तसेच प्रेक्षणीयही ठरला व सर्व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत राहिले.
आस्था पिंगळीकर, सृष्टी गंधे, अनन्या तुंगार ध्रुवी पोटे, प्राजक्ता चव्हाण, वैदेही रोकडे, सेजल क्षीरसागर, ईश्वरी भापकर, मूर्तुश्रि बाबू
या विद्यार्थी कलाकारांनी मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
लतादीदींच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमासाठी सभागृहाच्या प्रवेशद्वारात दिनेश मंजतरकर यांनी लतादीदींच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी रेखाटली होती. पुण्याचे नुपूर साऊंड निनाद कांबळे साऊंड इंजिनियर व अवधूत गुरव यांनी साऊंड व लाईट व्यवस्था उत्तमरीत्या पार पाडली, कार्यक्रमाच्या चित्रीकरण नाशिकचे महारुद्र अष्टुरकर व नगरसेवक पत्रकार सिद्धार्थ दीक्षित यांनी पाहिले. कार्यक्रमाची सांगता हे मेरे वतन के लोगो हे गीत गाऊन लतादीदींना स्वरांजली अर्पण केली.
ह्या कार्यक्रमास चिन्मय जी सुकटणकर, डॉ निरजजी करंदीकर, सौ दिप्ती करंदीकर, सौ शुभा बोगावत, डॉ प्रिती नाईक, डॉ सौ गरूड, डॉ सौ चेडे, अशोक मवाळ, अजय दगडे, दिलीपजी अकोलकर, अनिरुद्ध मिरीकर, ज्ञानेश कुलकर्णी, किशोर कुलकर्णी, मिलिंद कोलते,
नंदकिशोर आढाव, संजय हिंगणे, आनंद ऋषी, संजय दळवी महेश घावटे, गोकुळ काळे यांच्या सह अनेक मान्यवर, संगीतप्रेमी उपस्थित होते.
लतादिदींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी स्वरांजली या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष असून हा कार्यक्रम दरवर्षी करण्यात येणार असल्याचे सौ वर्षा पंडित यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यामागे अनेकांचे हात असतात व त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व क्षेत्रातील तज्ज्ञ व सर्व स्तरातील अनुभवी लोकांकडून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुंदर प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करताना असेच लोकांच्या आवडीचे उत्तमोत्तम कार्यक्रम विद्यालयामार्फत पुढेही करत राहू. असे प्रतिपादन विद्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत पंडित यांनी केले…
अविस्मरणीय सुरेल कार्यक्रमा साठी आपले योगदान केल्याबद्दल सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार.