Sachin Jagtap : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. सचिन जगताप(Sachin Jagtap) यांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. आता त्यांनी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. सचिन जगताप यांनी अभिनय (Acting) क्षेत्रात एन्ट्री मारली आहे. सन टिव्हीवरील लोकप्रिय असलेल्या ‘इन्स्पेक्टर मंजू’ (‘Inspector Manju’) या मालिकेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका (The role of the Chief Minister) त्यांनी साकारली आहे. या माध्यमातून त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले आहे.
नक्की वाचा:राज्यातील नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर;वाचा कुठे जाहीर झालं आरक्षण?
‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका (Sachin Jagtap)
सन मराठीवर इन्स्पेट्कर मंजू या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ही मालिका सन मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून प्रचलित आहे. वाघोबा प्रॉडक्शनची ही निर्मिती आहे. प्रसिध्द निर्माता तेजपाल वाघ, सरोज वाघ हे या मालिकेचे निर्माते आहेत. मोनिका राठी, वैभव कदम, विद्या सावळे, अजय तापकिरे या कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे या मालिकेला वेगळी उंची गाठून दिली आहे. आता या मालिकेत अहिल्यानगर येथील सचिन जगताप हेही अभिनय करणार आहेत. या मालिकेत त्यांनी मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली आहे. ही मालिका सन मराठीवर रात्री ८ वाजता प्रसारित होते. ७ ते १० ऑक्टोबर व त्यापुढील भागांमध्ये सचिन जगताप हे या मालिकेमध्ये दिसणार आहेत.
अवश्य वाचा: महिलांच्या भारत-पाकिस्तान सामन्यात काय घडलं ? खेळाडूंच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल
सचिन जगताप यांची कारकीर्द (Sachin Jagtap)
जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऐन रंगात आल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मांडवगण गटात मागील २० वर्षांपासून सचिन जगताप यांचा राजकीय दबदबा आहे. राजकारण, समाजकारण,कायदा व मनोरंजन क्षेत्रात ते योगदान देत आहेत. गतवर्षी झालेल्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सचिन जगताप यांनी मास कम्युनिकेशन केले आहे. अरुणोदय ए.जे. प्राॅडक्शनच्या माध्यमातून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. नगर हे चित्रपट निर्मितीचे हब करण्याचा त्यांचा मानस आहे. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अरुणोदय फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ते आमदार संग्राम जगताप यांचे मोठे बंधू आहेत.