Flood Relief Package : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा (Flood Relief Package) केली आहे. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी ३.४७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
नक्की वाचा : रेल्वेनंतर आता बीडला विमानतळ होणार;नेमकं कुठे होणार विमानतळ?
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांनी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अवश्य वाचा: सचिन जगताप आता मुख्यमंत्री;सन टीव्हीवरील ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये साकारणार भूमिका
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?(Flood Relief Package)
“महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या घरांचं, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमीनही खरडून गेली. त्यामुळे आता पुढच्या रब्बीचे पिकेही त्या ठिकाणी घेता येणार नाहीत. मात्र, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आता निर्णय घेतला आहे. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे”,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी (Flood Relief Package)
दुधाळ जनावरांना ३७ हजार रुपयांपर्यंत मदत
गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार
कुक्कुटपालनाला १०० रुपये प्रति कोंबडी
नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
डोंगरी भागातील घरांना १० हजारांची अधिकची मदत
झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना ५० हजार मदत करणार
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार
पीक नुकसानभरपाई
शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये
हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई – हेक्टरी २७ हजार रुपये
बागायती शेती नुकसान भरपाई – हेक्टरी ३२ हजार रुपये
विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार रुपये
कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार