नगर : आम्ही शेतकऱ्यांची (Farmers) दिवाळी काळी होऊ देणार नाही,असा शब्द दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांना तामिळनाडू (Tamilnadu) आणि पंजाबपेक्षा मोठे पॅकेज (Marathwada Compensation Package) दिले आहे. आम्ही शेतकऱ्यांना अधिकाअधिक मदत देण्याचा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटीच्या पॅकेजची घोषणा
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. आम्ही इतका मोठा पाऊस कधीही पाहिला नव्हता. आम्ही बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. जवळपास ६५ लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त आहे. अशा काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विरोधक शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या, तेवढं पॅकेज द्या सांगत होते. मराठवाड्यातील लाखो हेक्टर जमिनीवरील पिकं आडवी झाली आहेत. पशुधन वाहून गेले आहे,जीवितहानी झाली आहे. अशा प्रसंगात शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. ही मदत अंतिम नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहे,असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
अवश्य वाचा: रेल्वेनंतर आता बीडला विमानतळ होणार;नेमकं कुठे होणार विमानतळ?
शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचे काम करू- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
सर्व निकष बाजूला ठेवत आम्ही शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. जे जे उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत. कितीही आर्थिक ओढाताण असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीसाठी आम्ही एनडीआरएफ व्यतिरिक्त अतिरिक्त १० हजार रुपयांची मदत करणार आहोत. अमित शाह आले तेव्हा त्यांना विनंती केली, केंद्राची मदत देखील झाली पाहिजे, असं सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या मागे केंद्र सरकार उभं राहिले. यावेळचं संकट बघत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकरी आपला मायबाप आहे, त्याचे अश्रू पुसण्याचे काम आपण करु. पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहू, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.