Fraud : जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Fraud : जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

0
Fraud : जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
Fraud : जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Fraud : नगर : जमीन खरेदी करून देतो असे सांगून एकाकडून ५० लाखांची रक्कम घेवून नंतर जमिनीची खरेदी (Land Purchase) करून देण्यास टाळाटाळ करत आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २२ नोव्हेंबर २०१६ ते २७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत अहिल्यानगर तालुक्यातील शेंडी तसेच नगर शहरातील दिल्लीगेट परिसरात घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : किसान सभेसह विविध संघटनांची शुक्रवारी आंदोलनाची हाक

हसन अमीर राजे (रा. पारनेर) यांनी दिली फिर्याद

आहे. फिर्यादी हसन राजे यांची शेंडी येथील नसीर साहेबलाल शेख, नजीर साहेबलाल शेख, अबिदा अब्बास सय्यद, एकनाथ दगडू भगत यांच्याशी जमीन खरेदी व्यवहाराबाबत चर्चा झाली होती. या चौघांनी फिर्यादी यांना जमिनीची खरेदी करून देण्याबाबत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडून सुमारे ५० लाखांची रक्कम घेतली.

अवश्य वाचा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; ‘राष्ट्रवादी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जमिनीची खरेदी देण्यास टाळाटाळ (Fraud)

नंतर जमिनीची खरेदी देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांना पैसेही परत दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.