
Superintendent of Police : नगर : अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावरून तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या बद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावण्यात आली. या पत्रकात शहराचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांचे नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून शहरात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समस्त आंबेडकरी समाजाने केला आहे.
अवश्य वाचा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; ‘राष्ट्रवादी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन
आंबेडकरी समाजाने व्यक्त केला तीव्र निषेध
या संदर्भात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.” दरम्यान, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात घडलेल्या निंदनीय प्रकाराचाही तीव्र निषेध आंबेडकरी समाजाने व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : किसान सभेसह विविध संघटनांची शुक्रवारी आंदोलनाची हाक
कठोर शिक्षा करण्याची मागणी (Superintendent of Police)
संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, अतुल भिंगारदिवे, सागर ठोकळ, सिद्धार्थ आढाव, सुहास पाटोळे, सचिन शेलार, प्रा. विलास साठे, संदेश लांडगे, अंकुश मोहिते, सुनील शेत्रे, भीमराव पगारे, पप्पू शिंदे, प्रमोद वडागळे, सतीश शिरसाठ, योगेश थोरात, अमित काळे, अतुल ढेपे, समीर भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, विशाल गायकवाड, सुभाष वाघमारे, राहुल शिवशरण, अजय पाखरे आदी उपस्थित होते.