Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार 

Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार 

0
Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार 
Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार 

Rohit Sharma : नगर: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची (India Cricket Team) नुकतीच घोषणा झाली. त्यानुसार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी शुभमन गिलला (Shubman Gill) भारतीय वनडे संघाचा कर्णधार नेमण्यात आलं आहे. निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार होत आहे.

अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

2027 च्या वर्ल्डकपचा विचार करून निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

यामध्ये रोहित शर्माच्या फॅन्ससह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी निवड समितीच्या या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त करत सोशल मीडियातून प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता रोहित शर्मा व विराट कोहली वनडे संघात असतील, मात्र, हे दोन्ही अनुभवी खेळाडू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळतील. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना जेव्हा रोहित शर्मा यांना कर्णधारपदावरून हटवण्याबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा निर्णय 2027 च्या वनडे वर्ल्डकपचा विचार करून घेतला आहे.

नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या निर्णयावरून एकच गदारोळ (Rohit Sharma)

रोहित शर्मानं अद्याप या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सोशल मीडियावर या निर्णयावरून एकच गदारोळ पाहायला मिळतोय. अनेकजण बीसीसीआयच्या या निर्णयावर टीका करतांना दिसत आहेत. या निर्णयानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला की, “रोहित कर्णधार नसणं माझ्यासाठी थोडं धक्कादायक आहे. जर तुम्ही रोहित शर्माची निवड करत आहात, तर त्यालाच कर्णधार बनवा. कारण अलीकडेच त्याने तुम्हाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिलीय. माझ्या मते, किमान या दौऱ्यात तरी त्याला संधी मिळायला हवी होती.

२०२७ चा वर्ल्डकप अजून खूप लांब आहे.” माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा म्हणाला, जर रोहित शर्मा कर्णधार नसेल, तर तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग असेल याची कोणतीही खात्री नाही. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ या टीकाकारांमध्ये अग्रस्थानी आहे. कैफ याचे स्पष्ट मत आहे की, रोहित शर्माला २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत कर्णधारपदी कायम ठेवण्याची संधी मिळायला हवी होती. कैफ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रोहितच्या नेतृत्वाचा जोरदार बचाव केला. त्यांनी थेट निवड समितीला लक्ष्य केले आहे. कैफ म्हणाला की, “रोहित शर्माने भारताला १६ वर्षे दिली आणि आपण त्याला कर्णधार म्हणून एक वर्षही देऊ शकलो नाही. १६ आयसीसी स्पर्धांमध्ये १५ सामने जिंकणारा आणि फक्त २०२३ चा वर्ल्ड कप फायनल हरणारा कर्णधार असतानाही हा निर्णय घेतला गेला. 

माजी खेळाडू आणि तज्ज्ञांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही या निर्णयावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर एकाने म्हटले आहे की, “पाच आयपीएल ट्रॉफी आणि अनेक वर्षांच्या मेहनतीच्या बदल्यात मुंबई इंडियन्सने त्याला काय दिले? फक्त अपमान आणि धोका. सलग दोन आयसीसी ट्रॉफी आणि वर्षानुवर्षांच्या यशाच्या बदल्यात बीसीसीआयने काय दिले? फक्त अपमान आणि धोका.” तर एकाने लिहलंय, “डिअर बीसीसीआय, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यासाठीचं एक कारण मला सांगा.” निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर अशा संतप्त प्रतिक्रिया उमठत आहेत.