CJI Bhushan Ramkrishna Gavai : नगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Ramkrishna Gavai) यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतीय न्यायव्यवस्थेच्या (Indian Judiciary) स्वातंत्र्याच्या रक्षणाची तातडीची मागणी करण्यात आली. या निषेधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाच्या वतीने मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आले.
अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली नोंदवला निषेध
यावेळी माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून न्यायव्यवस्थेवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला. यावेळी संजय झिंजे, निलेश मालपाणी, रोहन शेलार, नलिनी गायकवाड, सद्दाम सय्यद, किरण सपकाळ, चंद्रकांत उजागरे, भाऊसाहेब उडांशिवे, दिनकर सकट, नितीन खंडागळे, जितेंद्र नांदूरकर, दीपक सुडके, किशोर बुंदेले, अर्जुन माळवे, सचिन नवगिरे, राम वाणी, सिद्धांत कांबळे, बाबु कुरेशी, परवेज शेख, प्रमोद आढाव, अभिषेक जगताप, राहुल घोरपडे, प्रशांत दरेकर उपस्थित होते.
नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
निवेदनात म्हटले आहे की, (CJI Bhushan Ramkrishna Gavai)
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षात झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या आधारस्तंभावर झालेला थेट हल्ला आहे. वकिलाच्या वेशातील व्यक्तीने “सनातन धर्म” चे नाव घेत न्यायमूर्तीवर हल्ला केल्याची घटना ही धर्मांध आणि जातीयवादी मानसिकतेचे दर्शन घडवते. दलित न्यायमूर्तींना लक्ष्य करून हल्ला करणे हे उच्चवर्णीय जातीयवादाचे विदारक उदाहरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या संविधानिक पदांना अशा हल्ल्याद्वारे आव्हान देणे म्हणजे भारतीय लोकशाहीला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. सरकारने न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेबाबत तत्काळ आणि कठोर सुधारणा कराव्यात, तसेच या घटनेमागील खरे सूत्रधार उघड करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.