Shivajirao Kardile : नगर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून दिवाळीपूर्वीच (Diwali) शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार असल्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी आज (ता. ८) अहिल्यानगरमधील पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत विरोधक टीका करत आहेत. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की भाजप (BJP) सरकारच शेतकऱ्यांना मदत करू शकते, असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.
अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग सरचिटणीस चंद्रशेखर करमाळे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, (Shivajirao Kardile)
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे तसेच अनेक भागातील पंचनामे बाकी असून तेही येत्या १०-१२ दिवसांत पूर्ण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.