Sangamner Municipal Council : संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेचे (Sangamner Municipal Council) नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदेच्या १५ प्रभागांसाठी ३० सदस्यांची आरक्षण सोडत बुधवारी (ता.८) प्रांत कार्यालयात जाहिर करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण १०, सर्वसाधारण महिला १०, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४, अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला १ असे प्रभाग आरक्षण (Ward Reservation) झाले असल्याची माहिती नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी (Chief Officer-in-Charge) धनश्री पवार यांनी दिली.
अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
प्रशासकीय राज संपुष्टात येणार
संगमनेर नगरपरिषदेवर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राज सुरू असून लवकरच हे प्रशासकीय राज संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिका यांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले आणि यामध्ये संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या कार्यालयात नगरपरिषदेच्या हद्दीतील १५ प्रभागांसाठी ३० सदस्यांची आरक्षण सोडत जाहीर झाली.
नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक (Sangamner Municipal Council)
यामध्ये प्रभाग एकसाठी प्रभाग १ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १ च सर्वसाधारण, प्रभाग २ अ अनुसूचित जाती, प्रभाग २ व सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ३ व सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ च सर्वसाधारण, प्रभाग ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ५ व सर्वसाधारण, प्रभाग ६ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ व सर्वसाधारण, प्रभाग ७ अ सर्वसाधारण महिला, मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ८ ब सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ११ व प्रभाग १२ व सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ सर्वसाधारण महिला, प्रभाग प्रभाग ७ व सर्वसाधारण, प्रभाग ८ अ नागरिकांचा प्रभाग ९ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ९ व महिला, प्रभाग १० च सर्वसाधारण, प्रभाग ११ अ सर्वसाधारण, प्रभाग १२ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, अ अनुसूचित जाती महिला, प्रभाग १३ व सर्वसाधारण, प्रभाग १४ अ सर्वसाधारण महिला, १४ ब सर्वसाधारण, प्रभाग १५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १५ व सर्वसाधारण महिला. असे प्रभाग नुसार आरक्षण जाहीर झाले आहे.