Shivsena UBT : शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी ; तहसीलदारांना शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन

Shivsena UBT

0
Shivsena UBT : शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी ; तहसीलदारांना शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन
Shivsena UBT : शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी ; तहसीलदारांना शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन

Shivsena UBT : नगर : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतकर्यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे. पिक विम्याचे (Crop Insurance) कठीण निकष तातडीने शिथिल करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता मोबदला देण्यात यावा या मागणीचे निवेदन नगर तालुका शिवसेना (ठाकरे गट ) (Shivsena UBT) यांच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.

अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते, पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील काठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बैंक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, काहींकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहेत.

नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

सरसकट कर्जमुक्तीची मागणी (Shivsena UBT)

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. हि कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये धकबाकीदार चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पिक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पालीहाउस, दुध उत्पादक शेतकर्यानी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ठ करण्यात यावी. यावेळी राजेंद्र भगत शिवसेना नगर तालुका प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे),प्रवीण गोरे युवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) , माजी नगरसेवक योगीराज गाडे, नगर तालुका प्रमुख प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, गणेश कुलट, संतोष काळे, अनिल परभणे, पोपट निमसे, जीवा लगड, संदीप खामकर, संतोष मचे, अर्जुन टांगळ, विष्णू चेमटे, निसार शेख, रामेश्वर सोलट, बाबासाहेब ससे, भरत गांगुर्डे, किरण गांगुर्डे, अरुण ससे, शेख आयाज, आकाश आठरे, दीपक शिंदे उपस्थित होते.