Voter List : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

Voter List : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

0
Voter List : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
Voter List : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

Voter List : नगर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी (Election) १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी (Voter List) तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हरकती व सूचना लेखी सादर करण्याचे आवाहन

यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर (Voter List)

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निरीक्षणासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती विहित वेळेत दाखल कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.