नगर : राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) गुड न्यूज (Good News) आहे. सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये लवकरच खात्यावर जमा होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यामुळे आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता (September installment) मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी ४१०.३० कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा: पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
सप्टेंबर महिन्याचा हफ्ता १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत मिळणार (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहिण योजना सध्या KYC च्या प्रक्रियेमध्ये अडकली आहे. लाखो लाडक्या बहिणींना आता KYC प्रक्रियेतून जावं लागत आहे. अशातच दिवाळी आता दोन आठवड्यावर आल्यामुळे दिवाळीचा हफ्ता कधी येईल, याबद्दल अनेक जण तर्कवितर्क लावत होते. पण,आता लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होणार आहे, असा आदेशच महायुती सरकारने काढला आहे.
अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटीच्या पॅकेजची घोषणा
KYC नसेल तरी मिळणार हफ्ता (Ladki Bahin Yojana)
ज्या महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी KYC केली असेल किंवा केली नसेल तरी सप्टेंबर महिन्याचा हफ्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा सगळ्या बहिणींना मिळणार आहे. सध्या लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे KYC ची अट तुर्तास वगळण्यात आली आहे. वेबसाईट सुरळीत सुरू झाल्यावर सर्व महिलांना KYC करणे अनिवार्य असणार आहे
ई-केवायसी करताना ओटीपीचं येत नसल्याचं उघड झालं आहे. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार देखील केली आहे. आता स्वतः मंत्री आदिती तटकरे यांना या समस्येची दखल घ्यावी लागली. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल, असं आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलं आहे. मात्र अजूनही ओटीपीची अडचण कायम आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर KYC प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.