Gold Prices Today: सोन्या-चांदीची गगन भरारी! १० ग्रॅम सोन्याचे दर ऐकून आश्चर्यचकित व्हाल…

0
Gold Prices Today:सोन्या-चांदीची गगन भरारी! १० ग्रॅम सोन्याचे दर ऐकून आश्चर्यचकित व्हाल...
Gold Prices Today:सोन्या-चांदीची गगन भरारी! १० ग्रॅम सोन्याचे दर ऐकून आश्चर्यचकित व्हाल...

Gold Prices Today : सोने आणि चांदीच्या दराने (Gold And Silver Rate) सध्या उच्चांक (Increase Rate) गाठला आहे. सण समारंभाच्या तोंडावर वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर सव्वा लाखांच्या घरात जाताना दिसत आहे. आज १ लाख २२ हजार ८१० रुपयांवर २४ कॅरेट सोन्याचा भाव पोहोचला आहे. तर एक किलो चांदीसाठी १ लाख ४८ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या (Jalgaon Gold Rate) सुवर्णनगरीत गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. जळगावात सोन्याचे दर १ लाख २३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम तर जीएसटीसह एक लाख २६ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे.

नक्की वाचा: लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; सप्टेंबरच्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर 

सोन्याच्या भावाचा ट्रेंड चढता राहणार? (Gold Prices Today)

तज्ञांच्या मते, सध्या जागतिक भूराजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगभरातील तज्ञ सोन्या- चांदीच्या या चढ्या ट्रेंडमागे अमेरिकेने केलेले शटडाऊन प्रमुख कारण ठरल्याचं सांगितलं आहे. किमती वाढल्यामुळे जागतिक पातळीवर मागणीत घट झाली आहे. दागिन्यांच्या बाजारपेठेत ग्राहक वेट अँड वॉचच्या  भूमिकेत असल्याचे दिसत आहेत.

अवश्य वाचा: डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलेले आयपीएस अधिकारी पूरन कुमार कोण होते ?  

कोणत्या शहरात सोने कितीवर ? (Gold Prices Today)

इंडियन बुलियन असोसिएशननुसार, आज नवी दिल्लीमध्ये २४  कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ६९० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीची किंमत १ लाख ४८ हजार ८४० रुपये प्रति किलो झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १२ हजार ४६६ रुपये असून तोळ्यामागे १लाख ३१ हजार १७८ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, पुण्यात २४ कॅरेट सोन्याला १,२२,९५० रुपये मोजावे लागत आहेत. या वाढीमागे जागतिक आणि आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल-गाझा संघर्ष आणि अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता यासारख्या घटनांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे लक्ष वेधले आहे. यामुळे मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.