Ajit Pawar:”लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार 

0
Ajit Pawar:
Ajit Pawar:"लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल"- अजित पवार

Ajit Pawar: “लाडकी बहीण” योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलंय.

 नक्की वाचा: लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; सप्टेंबरच्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर  

“केवायसीसाठी मुदत वाढवता येईल”- अजित पवार  (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले की, केवायसी करताना अडचणी येत आहेत. ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती. परंतु, आता हा निधी त्याच लाडक्या बहिणींना मिळेल जी पात्र लाभार्थी असेल. त्यासाठी आपण केवायसी करतोय. आपण मुदत वाढवायची असेल तर ते देखील करु. पण केवायसी ही करावीच लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा: सोन्या-चांदीची गगन भरारी! १० ग्रॅम सोन्याचे दर ऐकून आश्चर्यचकित व्हाल…  

सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक -अजित पवार   (Ajit Pawar)


गेल्या वर्षी दिवाळीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना सुरू केली होती. यावेळी मात्र निधीची चणचण हे कारण देऊन सरकारने ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की,  काही योजना चालू असतात, सगळ्याचं कायम चालतात,असे नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जातात.आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळायचा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. काही योजना आल्यावर त्याचा उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यामध्ये आपण बदल करत असतो. त्यानुसार आम्ही मार्ग काढत आहोत, असे देखील पवार म्हणालेत.