नगर : भारताच्या घरगुती क्रिकेट हंगाम म्हणजेच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. १६ खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली असून, अनुभवी अंकित बावणे (Ankeet Bawane) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघात पृथ्वी शॉ, जलज सक्सेना आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहेत. ऋतुराजने गायकवाडने यापूर्वीही राज्य संघाचे नेतृत्व केलेले आहे.
नक्की वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
पृथ्वी शॉला पुन्हा मिळाली संधी (Ranji Trophy)
निवडकर्त्यांनी अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देत राजवर्धन हंगरगेकरच्या जागी प्रदीप दाधे याची निवड केली आहे. पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेना हे दोघेही महाराष्ट्र संघात दाखल झाले होते. पृथ्वी शॉने कठीण काळानंतर आपला जुना मुंबई संघ सोडला होता. त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही आपले स्थान गमावले होते. आता तो आपल्या कारकिर्दीला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्राच्या संघात सामील झाला आहे.
अवश्य वाचा: ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
केरळविरुद्ध महाराष्ट्राची पहिली लढत (Ranji Trophy)
महाराष्ट्राला या हंगामात ग्रुप बी मध्ये स्थान मिळाले आहे. या गटात केरळ, सौराष्ट्र, चंदीगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तिरुअनंतपुरम येथे केरळविरुद्ध खेळवला जाणार आहे.
महाराष्ट्राचा संघ :
अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, सौरभ नवले (यष्टीरक्षक), मंदार भंडारी (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दधे, हितेश वाळुंज, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे, रजनीश गुरबानी.