Ayyappa Temple : नगर : अहिल्यानगरमध्ये केरळी समाज (Kerala Society) गुण्यागोविंदाने नांदत असल्याचा आनंद वाटला. केरळ मधून येथे येऊन मराठी होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. राष्ट्रीय एकत्मातेसाठी केरळमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. सर्व देश एक राहून एका विचाराराने चालला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. अय्यप्पा मंदिरा (Ayyappa Temple) आल्यावर मनात केरळमधेच आल्याचा भाव निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी केले. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे गुरुवारी (ता.९) नगरमध्ये आले असता त्यांनी शहरातील अय्यप्पास्वामी मंदिरास जाऊन श्री अय्यप्पास्वामींचे (Ayyappa Swamy) दर्शन घेतले.
नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
केरळच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत
यावेळी अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने राज्यपाल आर्लेकर यांचे केरळच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रफुल्ल केतकर, राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते. अय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष बाबूशेट टायरवाले, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण व सचिव वसंत सिंग यांनी सर्वांचे स्वागत करून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार केला.
अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू आर्लेकर यांच्या हस्ते सुपूर्द (Ayyappa Temple)
यावेळी अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने जामखेड येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणाऱ्या मोठ्या स्वरूपात गरजेच्या वस्तू राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी शाम जाजू म्हणाले, नगरमध्ये केरळी समाज स्थायिक होत निष्ठेने काम करत आहेत. याचे चांगले उदाहरण म्हणजे बाबूशेट टायरवाले. देशासाठी, सत्य सनातन धर्मासाठी, हिंदुत्वासाठी काम करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन वसंत सिंग यांनी केले. सहसचिव उदय कुमार यांनी आभार मानले.