AMC : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले

0
AMC : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
AMC : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले

AMC : नगर : अहिल्यानगर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता खोदून ठेवून त्याचे कॉंक्रिटीकरण अद्याप झालेले नाही. ठेकेदारांनी “निधीअभावी काम थांबले आहे” असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या (AMC) दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचा आरोप माजी नगरसेवक नज्जू पहिलवान (Najju Pahilwan) यांनी केला आहे.

नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार

सणासुदीच्या काळात रस्ता खुला करण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या काळात आलेल्या १५० कोटींच्या रस्त्यांच्या यादीतील हा प्रमुख रस्ता आहे. तेव्हापासून हे काम रस्ता खोदून ठेवलेले आहे. या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करून सणासुदीच्या काळात रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यात अडथळा (AMC)

झेंडीगेट ते स्टेट बँक चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय या परिसराचा संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिसरातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून काहींना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी व्यथा व्यावसायिक व्यक्त करत आहेत. तसेच दुचाकींचे अपघात वाढले आहेत. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. बूथ हॉस्पिटलजवळील रस्ता खोदलेला असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना रुग्णालयात पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.